परीक्षेचा ताण नसावा पण... तयारी असावी |

ताण नसावा पण... तयारी असावी | अन्न, वस्त्र, निवारा ह्या समस्त मानवजातीच्या मुलभूत गरजा आहेत आणि ह्या गरजा पुर्ण करण्यासाठी तो सतत कार्यरत असतो. ह्याच बरोबर 'शिक्षण' ही सुध्दा आवश्यक अशीगरज मानली जाते. जसा प्राणवायूहा आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी मदत करतोतसेच शिक्षण हे आपल्याला आयुष्यात जगण्याची शिकवण देत असते. शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणजे परिक्षा. आपल्याकडे प्राचीन काळापासून शिक्षणाची परंपरा चालु आहे. आपल्याला किती ज्ञान प्राप्त झाले, त्याचे कितपत आकलन झाले यासाठी परिक्षापध्दती अस्तित्वात आली. विद्यार्थ्यांच्या बौध्दीक प्रगतीमध्ये परिक्षेचा फार | मोठा वाटा असतो. कालानुरुपशिक्षणपध्दतीजशीबदलत गेली त्याचप्रमाणे परिक्षांचे स्वरुप ही बदलत गेले. चाचणी, सामाई,वार्षिक असे नवनवे फंडे परिक्षेच्या माध्यमातून मुलांसमोर येऊ लागले. आज गल्लीबोळात खाजगी क्लासेस उघडलेले दिसतात. जास्ती जास्त मार्व मिळविण्याच्या फंद्यात अडकून अनेक पालक आपल्या मुलांना अशा खाजगी क्लासेसमध्ये घालतात. शाळेतला अभ्यास कर क्लासमध्येसुध्दा अभ्यास अश्या कात्रीत मुले सापडलेली असतात. त्यातच पालकांचे मार्कच्याबाबतीत वाढत जाणारा दबाव अशा द्वीधामनस्थितीत मुले जगतात. . आता दहावीच्या बारावीच्या परिक्षाही सुरु होतील. ह्या बोर्डाच्या परिक्षा मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी फार महत्वाच्या असतात. त्यामुळे वर्षभरखूप अभ्यासात मेहनत करुनमुलेया परिक्षांना सामोरे जातात. शेजारच्या मुलाला इतके टक्के मिळाले, मित्राचा मुलीला | मेडीकलमध्ये अॅडमिशन मिळाले, अशी दुसऱ्यांची उदाहरणे देऊन पालक मुलांना अधिकचतणावाखाली आणतात आणि ह्या सततच्या दबावाखाली काही मुले निराश होऊन आत्महत्येचामार्ग स्विकारतात. प्रत्येकाची बौध्दीक क्षमताहीसारखीनसते. मुलांना जितके समजते| तिककेच ते आत्मसात करतात. शाळेत - कॉलेजात जाणारी मुले हीवेगवेगळ्या सामाजिक स्तरातून आलेली असतात. त्यामुळे त्यांच्या घरातील व आजुबाजूच्या परिसराचा परिणाम त्यांचा अभ्यासावर | दिसून येतो.


परिक्षाकाळ हा मुलांच्यावर्षभराच्या मेहनतीवरचा सचोटीचाकाळ | असतो. याकाळात पालकांनीच मुलांना पुर्णपणे तणावमुक्त असे वातावरणात ठेवावे. सतत अभ्यास म्हणून त्यांच्यावरचा ताण कमी करण्यास मदत करावी. विसंगळा म्हणून त्यांच्याशी अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवर चर्चा करावी. त्यामुळे त्यांना बौध्दीकतेला आराम लाभेल. नापास झाल्यावर त्याचे परिणाम काय होतील, कितीमार्क पडतील, पुढे अॅडमिशन मिळेल का? ह्या साऱ्या गोष्टींचा विचारही मुलांचा मनात किंवा स्वत: पालकांनी आणू नये. आज पाहिलतर उच्चभ्रूसोसयटीमध्ये राहणारा विद्यार्थातितकेच टक्के मिळवतो आणि हालाखीच्या परिस्थितीशी झगडत शिकणारा विद्यार्थीही तितकेचटक्के मिळवतो. यावरुन शिक्षण हे प्रत्येक मुलाला | किती महत्वाचे असते हे आपण जाणतोच. नापास झालो म्हणून सारे आयुष्य संपले असे नाही. परिक्षेत नापास झालेली अनेक माणसे आज यशस्वी होऊन जगात आपले नाव लौकीक मिळवत आहेत.