२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यु

चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रत्येकी एक बळी गेलाय. तर देशभरात १७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वात जास्त अर्थात ४४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित केलं.


हा जनता कर्फ्यु असेल... अर्थात जनतेनं जनतेसाठी लावलेला कर्फ्यु

 नागरिकांनी घरातून बाहेर पडणं टाळा. ऑफिसची कामं घरातूनच करण्याचा प्रयत्न करा

 आपल्या आजुबाजुला असणाऱ्या वरिष्ठ नागरिकांनी येणारे काही आठवडे घराबाहेर पडू नये, असा मी आग्रह करतो

 प्रत्येक नागरिकानं निरोगी राहणं गरजेचं आहे

 नागरिकांनी सरकारच्या निर्देशांचं पालन करावं

 सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे

 'संयम'चा अर्थ गर्दी टाळणं... घराबाहेर पडणं टाळणं

 आपल्याला संकल्प करायला हवा की, आपण स्वत:ही करोनापासून वाचू या आणि इतरांनाही वाचवूया

 संकल्प आणि संयम हेच करोनाला उत्तर