उल्हासनगर (विशेष प्रतिनिधी): अनधिकृत बांधकामाची नगरी म्हणून उल्हासनगर शहर सर्वांनाच कुपरिचित आहे. राजकारणी, भूमाफिया ही मंडळी कायद्याला खुंटीला टांगून बिनधास्त अनधिकृत बांधकामे करतात. व महापालिकेचे अधिकारी कारवाई करण्याचे केवळ कागदी घोडे चालवतात. हे सर्वसामान्य जनतेपासून लपून राहिलेले नाही. अशातच उपमहापौर पदासारख्या महत्वाच्या पदावर असणाऱ्याने आपल्या सख्ख्या भावाच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण द्यावे व महापालिका प्रशासनास कारवाई करण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावेत हा "लुपा छुपीची" खेळ सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्याउपमहापौरपदावर असणारे भाजपाचे जमनादास पुरस्वानीयांचा भाऊहरेशपुरस्वानी पूर्णतःबेकायदायाने कॅम्प क्रमांक १ येथे चार मजल्यांच्या इमारतीची परवानगी असताना पाच मजल्यांची इमारत बांधली आहे. हा धक्कादायक प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश तलरेजा यांनी उघडकीस आणला. पाचवा मजला अनधिकृतरित्या बांधूनही उपमहापौर जमनादासपुरस्वानीमात्रयाइमारतीस पालिकेची परवानगी आहे. कोणतेही अतिरिक्त बांधकाम नाही. मला बदनाम करण्याचा हा संबंधितांचा चर्चेचा प्रयत्न आहे. अशी सफाई देत उल्हासनगर आहेत.मात्र महापालिकेलापाहणी महानगरपालिकेच्याउपमहापौरपदावर अहवालात या इमारतीवर पाचव्या जमनादास मजल्याचे बांधकाम सरू भाऊ हरेशपुरस्वानी असल्याचे .स्पष्टपणे म्हटले आहे. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी नगररचना विभागाच्या अभियंत्यांनी या वादग्रस्त इमारतीची पाहणी केली होती. त्यावेळी पाचव्या मजल्याचे अतिरिक्त बांधकाम सरू आहे. इमारतीच्या बाजचे सामासिक अंतर सोडले नसल्याचे त्यांनी अहवालात नमूद करून तो अहवाल पालिका आयुक्त बालाजी खतगांवकरांना सादर केला आहे. परंतु आज महिना झाला तरी या बांधकामावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आयुक्त बालाजी खतगांवकरही उपमहापौरांना त्यांच्या भावाच्या अनधिकृत बांधकामांला संरक्षण देत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उपमहापौरांच्या भावाचे अनधिकृत बांधकाम पाचवा मजला पूर्णतःबेकायदा! १ येथे चार