उल्हासनगर (प्रतिनिधी): उल्हासनगरात बोगस डॉक्टरांचा प्रचंड |सुळसुळाट झाला असून सामान्य रुग्णांचे जीवन धोक्यात आले आहे. या फसव्या डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी महापालिकेचे अधिकारी त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी डॉक्टरांचे दवाखाने कोणत्याहीयोग्य त्या नावांच्या पदव्यांच्या फलकांशिवाय सुरू आहेत. काही ठिकाणी केवळ दवाखाना असे लिहिलेले फलक आहेत तर काही ठिकाणी डॉक्टरांचे नाव आहे. त्यांची पदवी नाही असे फलक आहेत. दवाखान्यात दर्शनी भागात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र लावणे बंधनकारक असतांना ते अनेक ठिकाणी लावलेले आढळत नाही. अशा डॉक्टरांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई। करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे | झोपडपट्टयातून चाळीतून राहणाऱ्या गरीब रूग्णांचे आरोग्य जीव धोक्यात आले आहेत. याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजा रिझवाणीयांना विचारले असतात्यांनी सांगितले की, “येत्या काही दिवसांत शहरातील डॉक्टरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यावेळीडॉक्टरांच्या सर्व कागदपत्रांचीतपासणीकरण्यात येइल. णांचे जीवन धोक्यात आले.
महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष उल्हासनगरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट !