बोगस कागदपत्रांच्या आधारेभावाने घातला ७० वर्षीय बहिणीस गंडा

उल्हासनगर (प्रतिनिधी): उल्हासनगर महापालिकेच्या मिळकत कर विभाग हा भ्रष्टाचाराने पूर्णत: बरबटलेला असून रोज नित्य नव्या सुरस भ्रष्टाचारी कथा विभागाच्या उघड होत आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारेनावामध्ये बदल करणे, बोगसकर पावत्या बनवणे अशा बाबतच्या अनेक तक्रारी कर विभागातील कर्मचाऱ्यांविरोधात केल्या जात आहेत. असाच एक फसवणुकीचा प्रकार उघडझाला असून मावस भावाने खोटी कागदपत्रे तयार करून घर विकल्याचा आरोप कुसुमबाई लक्ष्मण गांगुर्डे या विधवा वृध्द महिलेने केला आहे. उल्हासनगर शहाड फाटक सीपी ७० वर्षाच्या वयोवृध्द विधवा महिला कुसुमबाई लक्ष्मण गांगुर्डे आपली विधवा सून व एक नातू र यांच्यासह राहते. महिलेने आपल्या मावसभाऊ वाघूगोगाजी उबाळे यांना राहण्याकरिता आपले घर दिले. वृध्द विधवा महिलेच्या एका मुलाचा २००४ रोजी दीर्घ आजाराने मृत्यू झाला. तसेच दसरा मुलगाहादारूच्या आहारी असून तो वेगळाराहतो. वृध्द विधवा महिलेच्या मागे कोणी नसून महिलेच्या भोळेपणाचाववृध्दपणाचा फायदा घेत भाऊ वाघू उबाळे यांनी खोटी बनावटकागदपत्रबनवून उल्हासनगर महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीनेच एकाच मालमत्ता क्रमांकाची दुसरी कर पावती २००४-०५ बनवली. बहिणीला विश्वासात न घेता भाऊ वाघू उबाळे यांनी परस्पर घर एका त्रयस्त व्यक्तीस विकले. महिलेला घडलेला प्रकार कळताच अधिकाऱ्यांच्या लक्षात आणूनादला. परतुआघकाराकाहाहा कारवाई करत नसल्यामुळे महिलेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे धाव घेतली. २०११ मध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही काही कारवाई होत नसल्यामुळे वृध्दमहिलेने दि.४ मार्च २०१४ रोजी शेवटचा श्वास असेपर्यंत न्याय मिळविण्याकरिता उमपासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री चव्हाण यांना दिले. महिलेच्या निवेदनाची दखल घेतगृहमंत्री आर.आर.पाटील यांनी उल्हासनगर पोलीस आयुक्त यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. असे वृध्द विधवा महिला गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले. महत्वाचा मुद्दा उमपाच्या मिळकत कर विभागात असलेल्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे गोरगरीब जनतेची फसवणूक करणायालोकांना अभय मिळत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने उल्हासनगर महापालिकेच्या कार्यक्षमतेला डाग लावण्याची शक्यता नाकारता येत नसून स्वत:चा निवारा हरवून बसलेली जनता न्यायाकरिता प्रशासनाच्या पायऱ्या झिजवत असून त्यांना न्याय मिळेल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.'