नेरळ : माथेरान-नेरळ-पोही या राज्यमार्ग रस्त्यावर डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण काम मंजूर होते. त्यातील डांबरीकरण काम पूर्ण करून ठेकेदाराने काम सोडून पळ काढला आहे, त्यामुळे नानक दाल सकन पट खड्ड्यांमुळे नेरळ रेल्वे गेटपासून साई मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे अंतर पार करायला जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी शनिवारी पाहणी केली असून लवकरच या रस्त्यावर खड्डे भरण्याची आशा निर्माण झाली आहे. माथेरान-नेरळ-पोही पुढे मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याचे नेरळ भागातील रुंदीकरण तसेच रुंदीकरण केलेल्या भागात डांबरीकरण आणि साईमंदिर भागात काँक्रीटीकरण हे काम ठेकेदाराने सुरूच केले नाही. या रस्त्यावरील धामोतेपासून पोहीपर्यंत असलेली डांबरीकरण कामे मार्चमध्येच पूर्ण करून ठेकेदार कंपनी कामे अर्धवट टाकून निघून गेली आहे. या रस्त्याच्या कामासाठी २०१८ च्या अर्थसंकल्पात सव्वातीन कोटी रुपयांची तरतूद होती. त्यात पोहीपासून धामोतेपर्यंत डांबरीकरण त्यात काही भागात खडीकरण करून डांबरीकरण ही कामे अंतर्भत होती. त्यानंतर नेरळ साईमंदिर परिसरात असलेली दकाने लक्षात येऊन तेथील रस्त्याचा २०० मीटरचा भाग काँक्रीटीकरण काम अंतर्भूत होते. त्याशिवाय गणेश स्वीटपासून नेरळ रेल्वे गेट या भागात रस्त्याचे रुंदीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण ही कामे अंतर्भत होती. मात्र, ठेकेदार कंपनीने पोहीपासन धोमोतेपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन्ही कामे केली नाहीत, त्यातील रेल्वे गेटपासून पुढे रस्त्याची रुंदी कमी असल्याने त्या ठिकाणी साइडपड़ी वाढवन त्यानंतर डांबरीकरण केले जाणार होते, त्यासाठी उन्हाळ्यात तीन महिन्यांचा कालावधी असतानाही ठेकेदार कंपनीने फक्त गंमत बघण्याचे काम केले आहे. त्याच काळात रेल्वे गेटच्या पलीकडे नेरळ ग्रामपंचायतीमधील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी पूर्ण रस्ता तब्बल सव्वा महिना बंद होता.
नेरळ-कळंब रस्ता अर्धवट, ठेकेदार गेला पळून