भारत आता विभागलेला देश

 


पुणे : देशात एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी असलेले नाते तुटत चालले आहे. एका समुहाचे दुःख दुसरा समूह जाणून घेताना दिसत नाही. त्यामुळे भारत एकसंध दिसत असला तरी तो आता विभागलेला देश आहे' अशी खंत दिल्ली विद्यापीठाचे प्रा. अपूर्वानंद यांनी शनिवारी व्यक्त केली. विविधता आणि बहुरूपता ह सस्कृताच मूळ तत्त्व आ आणि बहुरूपता हे संस्कृतीचे मूळ तत्त्व आहे. या तत्त्वांचे संरक्षण केल्याशिवाय संस्कृतीचे रक्षण करणे शक्य नाही', असहा त्याना नमूद कल. लोकायत संघटनच्या काफिला या सास्कृतिक आघाडातफ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अपूर्वानंद यांनी आपल्या मनोगतात मानवी सभ्यतेचा प्रवास, संस्कृती, व्यक्ती आणि समूहातील परस्पर संबंध, संस्कृतीच्या नावाखाली होणारी क्रूरता अशा विविध विषयांवर भाष्य केले. संस्कृती म्हणजे जगण्याची पद्धत आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस जे जे काही करतो, त्याचा संस्कृतीत समावेश होतो, त्याचे ढंग, प्रकार वेगवेगळे असू शकतात. ही विविधताच संस्कृतीचा पाया आहे. त्यामुळे विविधता, बहुलता ही संस्कृतीची मूळ तत्त्वे जपली पाहिजेत' असेही ते म्हणाले. आदिवासींच्या समस्या, जातीय-धार्मिक तेढ असे अनेक विषय देशात भेडसावत आहेत. लघुनाट्य, गाणी, नृत्य अशा कलच्या माध्यमातून या समस्या साडावण्यासा व्हावे,' अशी अपेक्षा डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी, लोकायतच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक विषयांवर गाणी, नृत्य, नाट्यप्रकाराचे सादरीकरण केले. लोकायत'च्या अलका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.