देशातील रुग्णांची संख्या ३७० वर

संपूर्ण देशात करोना विषाणूची आज ७० हून अधिक लोकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाली आहे. या बरोबरच भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून ती ३७० वर पोहोचली आहे. तर करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ७ वर पोहचली आहे. 

 गुजरातमध्ये एका करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीनं आज अखेरचा श्वास घेतल्याचं समोर आलंय. ६७ वर्षीय वृद्धाचा सूरतच्या एका खासगी रुग्णालयात मृत्यू झालाय. करोनामुळे झालेला हा गुजरात राज्यातील पहिला तर देशातील सातवा मृत्यू ठरला आहे.
देशभरात करोनाची लागण झालेल्यांची संख्या पोहोचली ३७० वर; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.